पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरु उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देऊन राज्यात १ हजार टुरिस्ट गाईड तयार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा पुढाकार. या ऑनलाईन प्रशिक्षणानंतर उमेदवारांना राज्य शासनाचे प्रमाणित टुरिस्ट गाईड म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार.
अधिक माहितीसाठी https://iitf.gov.in/ पोर्टलवर किंवा पर्यटन संचालनालयाच्या योगेश निरगुडे यांच्याशी दूरध्वनी क्रमांक ०२२-६२९४८८१७ वर किंवा diot@maharashtratourism.gov.in या ईमेलवर संपर्क साधण्याचे पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांचे आवाहन.
सविस्तर माहितीसाठी – https://www.mahasamvad.in/?p=33531