Ratan Tata : रतन टाटा यांचे हे दहा निर्णय टाटा ग्रुपसाठी टर्निंग पॉइंट ठरलेत

भारतातील उद्योगपतींचा विषय निघाला की सगळ्यात पहिल्यांदा नाव टाटा कंपनीच घेतलं जात. कारण या कंपनीने केवळ आपले अस्तित्वच सिध्द केले नाहीतर प्रत्येक व्यवसायात सर्वोत्कृष्ट अशी ख्यातीही मिळवून दिली. रतन टाटा यांनी टाटा ग्रुप जागतिक स्थरावर नेला आहे. कोरोनामुळे देशाची आर्थिक व्यवस्था अडचणीत सापडल्यानंतर तेव्हाही टाटा ग्रुपने देशाला भरगच्च अशा दीड हजार कोटींची मदत दिली होती. तेव्हाही रतन टाटा यांची देशभरात चांगलीच चर्चा झाली होती.

वर्ष १९८३ मध्ये एकदा टाटा बोर्डाची बैठक सुरु होती जेआरडी टाटा यांनी आगामी पुढच्या १० वर्षासाठी आपली योजना काय असावे असं बैठकीत समोर बसलेल्या अधिकाऱ्यांना विचारले. यात रतन टाटा यांचाही समावेश होता. जेआरडी टाटा यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना रतन टाटा म्हणाले होते की, येत्या १० वर्षात आपण जागतिक पातळीवर जाण्याच्या दिशेने पावले टाकले पाहिजेत. अस रतन टाटा यांनी म्हटलं होतं.(Ratan Tata)

टाटा ग्रुपची सुत्रे रतन टाटा यांना १९९१ मध्ये मिळाली. नवोदित उद्योगपतींसाठी ही चांगली वेळ होती. कारण या काळात भारतीय बाजारपेठेचा पाया बसत होता. परदेशी कंपन्यांनी भारतात पैसा गुंतवायला सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत टाटा कंपनीचा भारतासह जगभरात प्रसार करण्यासाठी रतन टाटा यांनी एक मास्टर प्लॅन बनवला होता. ११ वर्षात टाटा ग्रुपने भारत आणि विदेशातून एकूण ३७ कंपन्या खरेदी केल्या आहेत.

टेटली

रतन टाटा यांचा टेटली हा मास्टर प्लॅनचा पहिला फॉर्म्युला ठरला. त्यावेळी टेटली जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चहा पावडर विकणारी कंपनी होती. तर लिप्टन पहिल्या क्रमांकावर होता, त्याचवेळी टेटली तोट्यात गोली होती. यावेळी कंपनी विकण्याचा मुद्दा समोर आला. यात रतन टाटा यांनी मोठी संधी पाहिली. टाटा यांनी सुरु केलेली चहाची कंपनी तोट्यात गेली होती. ही कंपनी फायद्यात आणण्याची संधी त्यांनी यात पाहिली होती. रतन टाटा यांनी टेटलीवरील बोलीमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांना पराभूत केले आणि २७१ दशलक्ष युरोमध्ये टेटली कंपनी टाटा यांनी विकत घेतली. पुढील तीन वर्षांत कंपनीला नफ्यात आणले. अवघ्या काही वर्षांत टाटा ही जगातील दुसरी सर्वात मोठी चहा कंपनी बनली.(Ratan Tata)

CORUS

टाटा ग्रुपने CORUS सोबत पुढची मोठी डील केली. पण भारत आणि यूएस सरकारने स्टील उत्पादन आणि विक्रीमधील त्यांचे अनेक नियम बदलले. याचा थेट परिणाम टाटा स्टीलवर झाला. कंपनी दरवर्षी १८ दशलक्ष टन स्टीलचे उत्पादन करत होती. त्याचवेळी, तोट्यात असलेल्या कंपनीला दरवर्षी १० दशलक्ष टन स्टीलचे उत्पादन करण्यासाठी ते कमी करावे लागले. त्या काळात एका मुलाखतीत रतन टाटा हसत हसत म्हणाले होते, Market Would Come Round, याचा अर्थ मार्केट पुन्हा बरोबर होईल. तिथेही तसेच घडले. जवळपास एक दशक तोट्यात असलेल्या या कंपनीने पुन्हा बाजारपेठ काबीज केली आणि टाटा ग्रुपची सर्वात मोठी नफा कमावणारी कंपनी बनली.

स्टारबक्स

टाटा ग्रुपने वेगाने वाढणाऱ्या स्टारबक्ससोबतही हातमिळवणी केली आणि कॉफी कंपनीसोबत त्यांची ५० टक्के भागीदारी केली. Starbucks साठी खाद्यपदार्थांचे उत्पादनही सुरु केले. आणि आज ही भागीदारी सर्वात जास्त नफा कमावणारी कंपनी आहे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने लिव्हर ग्रुपच्या पाया खालची वाळू सरकवली होती.

जग्वार आणि लँड रोव्हर

२००८ मध्ये झालेल्या या कराराबद्दल आपण ऐकले असेल. २००८ मध्ये टाटा ग्रुपने जग्वार खरेदी केली, पण एक मनोरंजक गोष्ट म्हणजे २.३ बिलियन डॉलर च्या या डीलमध्ये टाटाने सर्व पैसे रोख स्वरूपात दिले होते. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. टाटा मोटर्स या अगोदरच तोट्यात होती. आणि जग्वार खरेदी केल्यानंतर हा तोटा २९१ अब्ज रुपयांपर्यंत वाढला होता. पण स्वतः या डीलमध्ये सहभागी असलेले रतन टाटा यांनी विलंब न लावता यूएस आणि जगभरातील डीलर्संना भेटले. त्यानंतर फक्त जग्वारच नाही तर टाटा मोटर्सही नफ्यात आला. २०१७ मध्ये कंपनीने ३४ बिलियन यूएस डॉलर बिलियनची कमाई केली, जी आजपर्यंतची सर्वात जास्त कमाई होती.

बिग बास्केट

नूकतेच टाटाने बिग बास्केट या कंपनीलाही आपल्या ग्रपमध्ये घेतले. बिग बास्केट ही किराणा मालाची डिलिव्हरी करणारी कंपनी आहे, जी गेल्या काही वर्षांत नफा कमावण्यात अपयशी ठरली होती, पण या कंपनीचा टाटा समूहाचा समावेश झाल्यानंतर कंपनीची स्थिती सुधारली.

टाटा CLiQ

टाटा ग्रुपने CLiQ सोबत हातमिळवणी करून डिजिटल शॉपिंगमध्ये पुढं येण्यासाठी फ्रयत्न केले आहेत. या भागीदारीचा कंपनीला अजून फायदा झाला नसला तरी, वेगाने वाढणारी स्टोअर्स आणि कंपनीचे प्रमोशनल पॉलिसी पाहता ही कंपनी देखील टाटा नफ्यात आणेल असं दिसते.

भूषण स्टील

भारतातही टाटा ग्रुपने स्टीलचे उत्पादन करणारी कंपनी विकत घेतली. ज्यामध्ये भूषण स्टीलचे प्रमुख नाव आहे. तोट्यात असलेली भूषण स्टील बंद होण्याच्या मार्गावर होती आणि तिच्यावर हजार कोटींहून अधिक कर्ज होते. पण गेल्या ४ वर्षांपूर्वी टाटांनी भूषण स्टीलची खरेदी केली आणि आज कंपनीला नफ्यात आणण्यासाठी योग्य प्रयत्न केले जात आहेत.(Ratan Tata)

Hitachi

इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्येही टाटाने टाटा समूहात हिटाचीचा समावेश केला. हिताची समूहासोबत, टाटाने पुन्हा एकदा या विभागातील आपली कमकुवत पकड मजबूत केली आहे.

मार्कोपोलो

टाटाच्या ट्रक आणि बसेसची घसरलेली विक्री परत आणण्यासाठी टाटा ग्रुपने मार्को पोलोशी हातमिळवणी केली, बस आणि ट्रकमध्ये क्रांतिकारक बदल घडवून ही कंपनी टाटा समूहात समाविष्ट होताच, टाटा पुन्हा एकदा ट्रक आणि बस निर्माण करण्याचे सुरू करून उभा राहिला.

एअर इंडिया

नूकतेच टाटा समूहाने एअर इंडियाला आपल्या समुहात सामिल करुन घेतलं आहे. १८ हजार कोटींच्या या डीलनंतर एअर इंडियाही खासगी झाली, पण टाटा समूहासाठी हा करार सोपा नव्हता. एअर इंडिया सुमारे ७० हजार ८२० कोटींच्या तोट्यात गेली होती.

रतन टाटा यांनी घेतलेल्या या निर्णयांनी हे सिद्ध झालं आही की, आपल्या देशातील आणि जगातील सर्वोत्तम उद्योगपतीपैकी एक आहेत. या अशा अनेक निर्णयांमुले टाटा समुह आज दिमाखात आहे. (Ratan Tata)

Leave a comment

Discover more from M Rise Group

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading