Maharashtra 10th, 12th Exams 2022 : इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, परीक्षा कधीपासून? वाचा सविस्तर

SSC and HSC Board Exam 2022 Time Table – राज्यात दहावी, आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 10वीची परीक्षा 15 मार्चे ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Maharashtra 10th, 12th Exams 2022  : इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, परीक्षा कधीपासून? वाचा सविस्तर

विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे.  राज्यात दहावी, आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 10वीची परीक्षा 15 मार्चे ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कधी होणार? याची प्रतीक्षा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना होती, त्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत.

दोन वर्षांनंतर होणार दहावी बारावीच्या परीक्षा
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी अनेक परीक्षांना मुकले होते. ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट आल्यानंतर यंदातरी परीक्षा होणार का? असा सवाल अनेक विद्यार्थ्यांना पडला होता. याबाब वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत, दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यात बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान पार पडणार आहेत. तर त्यानंतर दहावीच्या परीक्षांना सुरूवात होणार आहे. दहवीच्या परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान पार पडणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ उपलब्ध होणार आहे. 14 फ्रेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत बारावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दहावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत.

दहावी परीक्षा वेळापत्रक

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षापरीक्षेचा कालावधीसंभाव्य कालावधीआवश्यक कामाचे दिवसनिकाल
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा05 एप्रिल 2022 ते 19 एप्रिल 202215 दिवस12दिवस
प्रात्यक्षिक श्रेणी / तोंडी व अंतर्गत मुल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा05 एप्रिल 2022 ते 25 एप्रिल 202221 दिवस16 दिवस
प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांचा | परीक्षा कालावधी25 फेब्रुवारी 2022 ते 14 मार्च 202218 दिवस21 दिवसअंदाजे निकाल माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वीचा निकाल जुलै 2022 च्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात
लेखा परीक्षा15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 202235 दिवस12 दिवस

बारावीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षापरीक्षेचा कालावधीसंभाव्य कालावधीआवश्यक कामाचे दिवसअंदाजे निकाल
प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांचा | परीक्षा कालावधी14 फेब्रुवारी, 2022ते 03 मार्च, 202213 दिवस13 दिवसअंदाजे निकाल उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी ) चा निकाल जूनचा पहिला/ दुसरा आठवडा
लेखा परीक्षा04 मार्च,2022 ते 07 एप्रिल, 202235 दिवस22 दिवस
माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षा31मार्च,2022 ते 09 एप्रिल, 202210 दिवस06 दिवस
प्रात्यक्षिक श्रेणी / तोंडी व अंतर्गत मुल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा31 मार्च,2022 ते 21 एप्रिल, 202222 दिवस16 दिवस

कसे असेल परीक्षांचे नियोजन?

ओमिक्रॉनसंदर्भात राज्य शासन खबरदारी घेत आहे. त्याबाबत राज्य सरकारने काही नियमही लागू केले आहेत. या नियमांचे पालन करून दहावी आणि बारावीची परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेता आल्या नव्हत्या. विद्यार्थ्यांना मुल्यमापनाच्या आधारे पास करण्यात आले होते.


Leave a comment

Discover more from M Rise Group

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading