सांगली जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कोर्स

मा.पंतप्रधान यांच्या स्किल इंडिया या संकल्पनेस अनुसरुन महाराष्ट्र शासनाने कुशल मनुष्यबळ व कुशल रोजगारयुक्त महाराष्ट्र हे ध्येय समेार ठेवले आहे. त्याअनुषंगाने कौशल्य विकासाच्या विविध योजनांव्दारे जिल्हयास लागणारे आवश्यक कुशल मनुष्यबळ उद्योगांच्या गरजेनुसार तयार करणे आवश्यक आहे.

जिल्हयातील विशिष्ट भौगोलिक तथा सामाजिक स्थिती, परंपरागत व्यवसाय, नैसर्गिक संसाधन तथा साधनसामुग्री इत्यादीच्या आधारे जिल्हयातील रोजगार/स्वयंरोजगासाठी अधिक मागणी असलेली क्षेत्रे विचारात घेऊन अधिक मागणी असलेल्या क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी युवक युवतींना उपलब्ध करुन माहे नोव्हेंबर २०२० पासून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कौशल्य योजना ३.० सुरु करण्यात येत आहे.

यामध्ये Electronics & Hardware, Power, Telecom, IT-ITes, Automotive, Construction, Mason Tilling, Domestic Data Entry Operator, Consstruction Electrician-LV, Decorative Painter, Junior Software Development, Distribution Lineman, Automotive Service Technician Level-4 Lathe Operative, अशा प्रकाराच्या विविध कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

यासाठी खालील लिंकवर गुगल फॉर्म मध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण करीता पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार दिनांक व वेळ एसएमएस अलर्टव्दारे कळविण्यात येईल.

तरी इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यासाठी https://bit.ly/36PsDd5 या लिंकवर सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री.ज.बा.करीम, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांनी केले आहे.

 अधिक माहिती करीता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, विजयनगर, दुरध्वनी क्रमांक (०२३३)  २६००५५४ वर संपर्क साधावा

Leave a comment

Discover more from M Rise Group

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading